Konkan News

Konkan News

भाजपा युवा मोर्चा कणकवली तालुका उपाध्यक्षपदी राजाराम उर्फ प्रद्युम्न मुंज यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदीप चंद्रकांत मेस्त्री यांनी भाजयुमो कणकवली तालुका कार्यकारिणी जाहीर केली असून कणकवली येथील युवा कार्यकर्ते राजाराम उर्फ प्रद्युम्न उदय मुंज यांची कणकवली तालुका उपाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती…

खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला “कायाकल्प उपक्रम” अंतर्गत डॉ. हर्षला वेदक यांची सदिच्छा भेट

खारेपाटण प्रा. आ. केंद्राचे समितीच्या वतीने करण्यात आले बाह्य मूल्यांकन खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ कोल्हापूर यांच्या वतीने व गुणवत्ता आश्वासन कक्ष यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला आज “कायाकल्प उपक्रम” अंतर्गत सन…

आम. निलेश राणे यांचा वाढदिवस वेंगुर्ले येथे तीन दिवस विविध कार्यक्रमानी होणार साजरा

मॅरेथॉन, कांदळवन सफाई, आरोग्य शिबिर सह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी इंडियन आयडल विनर “सलमान अली नाईट” खास आकर्षण वेंगुर्ले (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण चे आमदार तथा शिवसेना नेते निलेश नारायण राणे यांचा वाढदिवस वेंगुर्ले येथे तीन दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात…

ठाकरे शिवसेना कणकवली तालुक्याची 7 मार्चला बैठक

कणकवली (प्रतिनिधी): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली तालुक्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांची बैठक शनिवार, ०७ मार्चला सकाळी ११ वा. कणकवली विजयभवन येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना महिला आघाडी आणि युवासेनेचे सर्व आजी-आजी पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे…

अवैध सिलिका उत्खनन क्षेत्राचे ड्रोनद्वारे होणार मोजमाप

शासनाचे कारवाईचे आदेश; परशुराम उपरकरांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कासारडे गावासह अन्य आजूबाजूच्या गावांमध्ये खाणपट्टा / तात्पुरते परवाने मंजूर केलेल्या ठिकाणी अथवा अन्य जागेत विनापरवाना उत्खनन झालेल्या सर्व क्षेत्रांच्या सद्यस्थितीवर मागील तीन वर्षांच्या गुगल इमेजचा वापर करून दंडात्मक…

मेढा येथे ९ रोजी चौकचार मांड उत्सव

मालवण (प्रतिनिधी) : मालवण-मेढा येथील चौकचार मांड येथे वार्षिक मांड उत्सवाचे आयोजन सोमवार, ९ मार्च रोजी करण्यात आले आहे. यानिमित्त चौकचार मांड येथे सकाळी पूजा, दिवसभर दर्शन, नवस फेडणे व बोलणे, रात्री ८ वा. सामूहिक गाऱ्हाणे, रात्री १० वा. कलावंतीण…

कणकवली महाविद्यालयात ‘उद्योजक आपल्या भेटीला’ अंतर्गत चर्चासत्र

कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली कॉलेज, कणकवली येथे अकाउंटिंग अँड फायनान्स विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्यावतीने आयोजित ‘फळ प्रक्रिया उद्योगातील व्यवसायाच्या संधी’ यावर’ उद्योजक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विचारमंचावर प्राचार्य…

कणकवली रुग्णालयात ७ रोजी मणक्यांचे मोफत तपासणी शिबीर

कणकवली (प्रतिनिधी) : दी स्पाईन फाऊंडेशन, मुंबई, उपजिल्हा रुग्णालय, कणकवली व डॉक्टर्स फ्रायडे क्लब, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ७मार्च रोजी सकाळी ९ वा. येथील उपजिल्हा रुग्णालयात जिल्हयातील ग्रामीण भागातील रुग्णांच्या मणक्याचे मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. रुग्णांच्या…

गाळमुक्त नदी” मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करा -पालकमंत्री नितेश राणे

दूरदृश्य प्रणालीव्दारे घेतला आढावा जिल्हा गाळमुक्त करणार संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पूरस्थितीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी नद्यांची पात्रे गाळमुक्त करणे अत्यावश्यक असून, ‘गाळमुक्त नदी’ मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करून ती व्यापक स्वरूपात राबविण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे…

कोकणातील शेतकऱ्याला गृहीत धरू नका; राजू शेट्टी

सिंधुदुर्गात आंबा, काजू प्रश्नी १२ मार्चला मोर्चा काढणार सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांना हेक्टरी ५ लाख रुपये आणि ३ लाख रुपये नुकसान भरपाई सरकारकडून मिळावी, त्याचबरोबर इतर अनेक प्रश्नांच्या संदर्भात सरकारने ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी येत्या…