Konkan News

Konkan News

चौके सरपंचपदी शिवप्रसाद चौकेकर मोठ्या मताधिक्याने विजयी

मतदारांचे मानले आभार चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चौके ग्रामपंचायत रिक्त सरपंच पदासाठी मंगळवारी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत शिवप्रसाद अंकुश चौकेकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. चौके ग्रामपंचायत सरपंच पदासाठी अपक्ष उमेदवार शिवप्रसाद चौकेकर व अशोक चौकेकर या दोघांनी उमेदवारी…

शिवसेना संघटना जोमाने बांधूया

जिल्हाप्रमुख पद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच वैभव नाईक सावंतवाडीत सावंतवाडी (प्रतिनिधी) : येत्या दोन वर्षाचा आपल्याकडे वेळ असून शिवसेना संघटना जोमाने बांधूया, यापुढे तरुणांना संघटनेत संधी दिली जाईल असे आश्वासन उबाठा शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख माजी आमदार यांनी वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांना दिले.…

महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम; विदर्भात पारा 46°C पार, पुण्यात मात्र थोडा दिलासा

पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचा मोठा भाग सध्या तीव्र उष्णतेच्या लाटेच्या प्रभावाखाली आहे. विदर्भात सर्वाधिक परिणाम दिसून येत असून अमरावती येथे 46.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर काही ठिकाणी तापमान 45 अंशांच्या पुढे गेले आहे. अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर…

कोकण रेल्वे मार्गावर गुरूवारी रात्री मेगाब्लॉक

गेल्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप येणार कणकवली (प्रतिनिधी) : कोकण रेल्वे मार्गावर कणकवली पासून सहा किलोमिटर अंतरावरील साकेडी येथे अंडरपासचे काम पूर्णत्वास नेले जाणार आहे. त्यासाठी गुरूवार (ता.३०) रात्री ११ ते शुक्रवार (ता.१) पहाटे ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला…

महाराष्ट्र शासन रंगभूमी sensor बोर्ड ची सभा प्रथमच कुणकेश्वर देवगड येथे

सिंधुदुर्ग च्या नाट्य चळवळी साठी दिशा देणारी. रंगकर्मी व सदस्य विजय चव्हाण सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची अत्यंत महत्वाची सभा सिंधुदुर्ग मध्ये कुणकेश्वर येथे गुरुवार दिनांक 7 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता अध्यक्ष व सिनेस्टार विजय…

NMMS परीक्षेत ‘आदर्श’ भरारी! अन्वय देसाई जिल्ह्यात चौथा; करंजे विद्यालयाचे देदिप्यमान यश

कणकवली (प्रतिनिधी) : नॅशनल मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप (NMMS) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये करंजे नागवे साकेडी पंचक्रोशीतील आदर्श विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयातील ८ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, कुमार अन्वय अच्युत देसाई…

वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांवरील हल्ल्याचा डॉक्टर संघटनेकडून निषेध

दोषींवर कठोर कारवाई व्हावी वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा वैभववाडी डॉक्टर्स फॅटर्निटी क्लब (VDFC) व जिल्हा डॉक्टर संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत डॉक्टर…

अवैध उत्खनन रोखण्यासाठी आता भरारी पथके

कोकण विभागासाठी विशेष तरतुदी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील वाळू उत्खनन आणि विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच अवैध वाळू उपशावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यानुसार ८ एप्रिल २०२५ च्या वाळू…

प्रमोद जठार पुन्हा होणार आमदार

विधानपरिषदसाठी भाजपाकडून पहिली पसंती कणकवली (प्रतिनिधी) : विधान परिषदेसाठी भाजपच्या पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यता आली आहेत. भाजपने आपल्या यादीत माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे आणि प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या…

सिंधुदुर्ग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत ५२.९९ टक्के मतदान

१४ ग्रामपंचायतींतील ६७५३ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क मतदान प्रक्रिया शांततेत; उद्या सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्य व थेट सरपंच पदांच्या रिक्त जागांसाठी सोमवारी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत जिल्हाभरात सरासरी ५२.९९ टक्के मतदानाची नोंद झाली. एकूण १४…