Category कणकवली

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आय.सी.यू. सेवा सुरू

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या पाठपुराव्याला यश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात अखेर आय.सी.यू. (अतिदक्षता विभाग) सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. नगराध्यक्ष संदेश पारकर व जिल्हा शल्यचिकित्सकांसह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत ICU सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. दरम्यान…

मुलींच्या छेडछाडीप्रकरणी कणकवलीत दोघांना झोडपले

दोन युवकांना पोलिसांनी घेतले ताब्यात उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात दोन अल्पवयीन मुलींना इशारा करून छेड काढल्याचा ठपका ठेवत दोन युवकांना नागरिकांनी प्रसाद देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ४ वा.…

कणकवलीचा दहावीचा निकाल ९७.९८ टक्के

तब्बल २० शाळांचा १०० टक्के निकाल कणकवली (प्रतिनिधी) : दहावी परीक्षेत कणकवली तालुक्याचा निकाल ९७.९८ टक्के लागला. तालुक्यातून १४३६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यातील १४०७ उत्तीर्ण झाले. यामध्ये ७५३ पैकी ७३० विद्यार्थी तर ६८३ पैकी ६७७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. तब्बल…

कणकवलीत अवकाळी पावसाचा तडाखा

अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची त्रेधातिरपीट कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीत गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस बरसू लागला. गुरुवारी सकाळपासूनच वातावरणामध्ये उष्णता होती. दुपारच्या सुमारास रणरणते ऊन होते. सायंकाळी चार वाजल्यानंतर वातावरण ढगाळ पडले. वातावरणात अंधार जाणवू लागला त्यानंतर…

वाघेरी-रावराणेवाडी येथे ९ मे रोजी श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळाचा ५५ वा वर्धापन दिन सोहळा !

डबलबारी भजनाचा जंगी सामना व इतर कार्यक्रमांचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील वाघेरी-रावराणेवाडी येथील ‘श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ’ आपल्या गौरवशाली परंपरेचे ५५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या सुवर्णमयी वाटचालीनिमित्त शनिवार, दि. ९ मे २०२६ रोजी होळीचा चव्हाटा (मांड)…

कणकवलीत ९ मे रोजी ‘महाराणा प्रतापसिंह जयंती’ उत्सवाचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल

कणकवली (प्रतिनिधी) : वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, दि. ९ मे २०२६ रोजी कणकवली येथे भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह (राणे समाज) उत्सव समिती’च्यावतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून, यानिमित्त दिवसभर विविध…

गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी गुन्हा

कणकवली (प्रतिनिधी) : गोवा बनावटीची दारू गैरकायदा, बिगर परवाना ताब्यात बाळगलेल्या स्थितीत आढळल्याप्रकरणी रामचंद्र दत्ताराम तांबे (५८, फोंडाघाट हवेलीनगर) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने फोंडाघाट – हवेलीनगर येथे…

कणकवलीच्या विराज गोसावी यांना राज्यस्तरीय ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार प्राप्त

समाजाभिमुख पत्रकारितेचा गौरव कणकवली (प्रतिनिधी) : सोजाई आदिवासी महिला स्वीकास फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व काव्य संमेलन २०२६ मध्ये कणकवलीचे पत्रकार श्री. विराज विठोबा गोसावी यांना ‘आदर्श पत्रकार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे…

आमदार होताच प्रमोद जठारांचा सिंधुदुर्ग दौरा

सिंधुदुर्गातील भाजपा कार्यालयांमध्ये होणार सत्कार भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण कणकवली (प्रतिनिधी) : विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवड झालेले नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार हे ७ व ८ मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे. श्री.…

सिंधुदुर्गात इंधन टंचाई? अफवांना बळी पडू नका -प्रशासनाचा इशारा !

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळी सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांचे आगमन होत असल्याने काही काळ इंधन पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेत BPCL, HPCL आणि IOCL या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी तसेच जिल्ह्यातील पेट्रोल पंपचालकांशी समन्वय साधून…