Category कोकण

डामरेत राहते घर जळून खाक; पावणे दोन लाखांचे नुकसान

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील डामरे वरवचिवाडी येथील भिकाजी नारायण सावंत यांच्या घराला 3 मे रोजी मध्यरात्री रात्री 1 वाजता लागलेल्या आगीत 1 लाख 85 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यावेळी घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. 3 मे रोजी मध्यरात्री…

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे फोटो जाळल्याप्रकरणी ऍड. श्रीराम धोंडू चिंदरकर यांच्या तक्रारीवरून सर्व आंदोलकांवर आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

मुंबई (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दिनांक. 3 जानेवारी 2026 रोजी काही आंदोलकांनी बेकायदेशीर रित्या जमाव करून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा फोटो जाळले होते तसेच द्वेषपूर्ण उद्गार काढत त्यांचा अपमान केला होता. त्याच दिवशी पोलिसांनी सर्व…

खारेपाटण येथे लायन्स क्लब ऑफ बॉम्बे च्या वतीने १८ गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

प्रदीप पवार आणि हेमंत देवस्थळी यांच्या पुढाकाराने शैक्षणिक मदतीचा हात खारेपाटण (प्रतिनिधी) : समाजसेवेचा वारसा जपत ‘लायन्स क्लब ऑफ बॉम्बे कांजूरमार्ग वेस्ट’च्या वतीने नुकताच एक स्तुत्य उपक्रम खारेपाटण हायस्कूल येथे राबविण्यात आला. यावेळी दुर्गम भागातील आणि गरजू विद्यार्थ्यांचा शालेय प्रवास…

आंतरराष्ट्रीय बिबट दिनी ‘त्याला’ मिळालं जीवदान!

विहिरीत पडलेल्या बिबटची वनविभागाकडून सुखरूप सुटका मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील बुधवळे मळेशेत येथे विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुखरूप सुटका करण्यात आली. शनिवारी रात्री स्थानिक ग्रामस्थ श्री. राजु मुणगेकर व ग्रामपंचायत लिपिक श्री. संदिप बुधवळेकर यांनी परिमंडळ मालवण, नियतक्षेत्र कांदळगाव…

कलमठ गुरववाडी येथे ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न ग्रामस्थांनी उधळला..

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, स्वप्निल चिंदरकर यांच्यासह ग्रामस्थ आक्रमक; गुन्हा दाखल करण्याची केली मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कलमठ गुरववाडी येथे कथित ख्रिश्चन धर्मांतराचा प्रकार ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस येत रोखण्यात आल्याची घटना रविवारी ११ वाजता घडली आहे. यावेळी ग्रामस्थ…

बदलत्या काळातही वृत्तपत्रांचे महत्त्व वाढत चालले आहे – पालकमंत्री नितेश राणे

कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा दर तीन महिन्याला पत्रकारांसाठी विशेष आरोग्य शिबिर घेणार ,पालकमंत्र्यांचे अभिवच कणकवली (प्रतिनिधी) : आताच्या बदलत्या काळात वृत्तपत्र , सोशल मिडीया – युट्युब चॅनेल , वृत्तवाहिन्या अशा तीन विभागांत ही पत्रकार‌िता विभागली गेली आहे.…

खारेपाटण हायस्कूल मध्ये महाराष्ट्र राज्य व कामगार दिन उत्साहात साजरा

शाळेच्या स्वच्छता महिला कर्मचारी श्रीम.सुशिला कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण खारेपाटण (संतोष पाटणकर ) : “कष्टकरी हाच समाजाचा खरा कणा आहे,” हा संदेश देत खारेपाटण हायस्कूल येथे १ मे ‘महाराष्ट्र राज्य दिन’ आणि ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने…

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगिवे येथे क्रेन घेऊन जाणारा कंटेनर पलटी होऊन अपघात

महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षतेमुळे एकच आठवड्यात सलग ६ वा अपघात खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे येथे एका अवघड वळणावर कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर वरील क्रेन पलटी होऊन झालेल्या अपघातात क्रेन…

कोकणातून तुळशीदास रावराणे यांची राज्य कृषी पणन मंडळावर संचालकपदी नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून, कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंधुदुर्गचे सभापती तुळशीदास तुकाराम रावराणे यांची महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळावर संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण महसुली विभागाचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली…

तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी निकाल शंभर टक्के

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय कनिष्ठ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, तळेरे ता. कणकवली येथील फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील…