Category कोकण

शिरोडा वेळागर समुद्रात बुडालेल्या गडहिंग्लज येथील पर्यटक विद्यार्थ्याचा मृतदेह किनाऱ्यावरच सापडला

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागर येथील समुद्रात मंगळवारी सायंकाळी आंघोळीसाठी उतरलेल्या पर्यटकांपैकी एक पर्यटक विद्यार्थी बुडाल्याची धक्कादायक घटना घडली होती. प्रणय ज्ञानेश्वर देवमाने वय २१ वर्ष राहणार गडहिंग्लज कोल्हापूर असे त्याचे नाव आहे. त्याचा मृतदेह आज सकाळी ६…

कलमठमधील चिकन कचऱ्याची विल्हेवाट कणकवली नगरपंचायतीकडून लागणार

नगराध्यक्ष संदेश पारकर यांची सकारात्मक भूमिका कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ गाव हद्दीतील चिकन व्यावसायिकांकडून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कणकवली नगरपंचायतीच्या कचरा डेपोत लावण्यात यावी, अशी मागणी कलमठ ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी…

अन्नसुरक्षा विभागाचा वैभववाडीत छापा, गुटखा जप्त; एकावर गुन्हा दाखल

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील एका पान शॉपवर धाड टाकून 2838 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. अन्नसुरक्षा विभागाने मंगळवारी ही कारवाई केली आहे या प्रकरणी समर्थ पान शॉपचे मालक सदानंद मोतीराम पाडावे (रा. वैभववाडी) यांच्याविरुद्ध वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा…

शिरोडा वेळागर येथील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेला गडहिंग्लज येथील एक पर्यटक बुडाला

एक जण बचावला : पोलिस घटनास्थळी दाखल वेंगुर्ले (प्रतिनिधी) : शिरोडा वेळागर येथील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या पर्यटकांपैकी आज मंगळवार २ जून रोजी सायंकाळी एक पर्यटक बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रणव देवमाने वय २१ वर्ष रा. गडहिंग्लज असे त्याचे नाव…

गव्याच्या धडकेत रिक्षेचे मोठे नुकसान; चालक किरकोळ जखमी

गवारेड्यांचा वनविभागाने बंदोबस्त करा वाहनांचाकांची मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कळसुली -जाभळ स्टॉप ते गवसवाडा मार्गावर सोमवारी (दि. १ जून) रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास गव्याने रिक्षेला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात रिक्षेचे मोठे नुकसान झाले असून रिक्षाचालक…

अतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांची हटवा केवळ नरडवे रोडवरील स्टॉल धारकांवर अन्याय नको

कणकवलीतील अतिक्रमण हटाव मोहिमेवरून मा.आ. वैभव नाईक आक्रमक कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या आदेशानुसार कणकवली शहरातील नरडवे रोडवरील श्रीधर नाईक चौक ते म्हसकर हॉस्पिटल पर्यंत असलेले स्टॉल व दुकाने हटविण्यात येणार असल्याच्या सूचना नगरपंचायतीने सोमवारी स्पिकरवरून…

शासकीय वसतिगृहात अर्ज सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : समाजकल्याण कार्यालयांतर्गत असणाऱ्या मुला- मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरीता वसतिगृहातील रिक्त जागेवर प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाईन अर्जाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थी व विद्यार्थिनींना ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन समाजकल्याणचे प्रभारी…

ओसरगाव ग्रा. पं च्या वतीने शेतकऱ्यांना भात बियाणे वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील ओसरगाव ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामनिधीमधून ओसरगाव मधील शेतकऱ्यांना मोफत भात-बियाणे वाटप करण्यात आले. ओसरगाव सरपंच सुप्रिया कदम यांच्या हस्ते गावातील एकूण 150 शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन किलो भातबियाने वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच तसेच ग्रा. पं सदस्य…

शासकीय मैदानामधील दारूच्या बाटल्यांचा खच उचलून परिसरातील स्वच्छता

कुडाळ नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी केली स्वच्छता कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या शासकीय मैदानामधील दारूच्या बाटल्यांचा खच उचलून परिसरातील स्वच्छता कुडाळ नगरपंचायतीमार्फत करण्यात आली आहे. अशी माहिती गटनेता विलास कुडाळकर यांनी दिली आहे. कुडाळ तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या शासकीय…

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाला जिल्हा बँकेचे नेहमी सहकार्य राहीलः मनीष दळवी

सिंधुनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाला प्रशिक्षणाबाबत अधिक सहकार्य केले जाईल जेणेकरून सहकारी चळवळ अधिक गतीमानसाठी होण्यासाठी मदत होईल तसेच सहकारी मंडळाला जिल्हा बँकेचे नेहमीच सहकार्य मिळेल असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी…