Category कोकण

शिरशिंगे येथे ग्रामस्थांनी उधळून लावली जमीन मोजणी

भूमी अभिलेखचे अधिकारी परतले रिकाम्या हाती ! दलाल आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने सामाईक जमीन हडपण्याचा डाव : ग्रामस्थांचा आरोप सावंतवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरशिंगे गावातील जैवविविधतेने नटलेली अब्जावधी रुपयांची सामाईक जमीन हडपण्याचा मोठा डाव काही धनाढ्य…

कोकणात आता प्रत्येक तालुक्यात होणार ‘कनेक्टिव्हिटी दरबार’

मंत्री अॅड. आशिष शेलारांची संकल्पना नेटवर्क समस्येबाबत अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील दुर्गम व डोंगराळ गावांमध्ये मोबाईल नेटवर्क नसल्याच्या समस्येबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी घेतली. संयुक्त सहभागातून तालुकानिहाय नव्याने सर्वेक्षण…

विनापरवाना बंदूक बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

वेंगुर्ले पोलिसांची कारवाई वेंगुर्ले (प्रतिनिधी) : दाभोली राजापुरकरवाडी येथे वेंगुर्ले पोलीस पथकाने अचानक टाकलेल्या छाप्यात विवेक अर्जुन राजापूरकर (42) यांचेकडे बेकायदेशीररित्या व विनापरवाना असलेली एक सिंगल बॅरेल ठासणीची बंदूक सापडली. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये विवेक राजापुरकर याचे वर अवैध…

नांदगाव तिठा येथील वाहतूक कोंडीवर आरटीओचा कारवाईचा इशारा

बाजारदिवशी बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार पहिल्या रविवारी सवलत, त्यानंतर कठोर पावले उचलणार कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील नांदगाव येथे उड्डाणपुलाखाली तसेच बाजारदिवशी निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत ग्रामस्थांनी नांदगाव ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयात…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांसाठी सुवर्णसंधी !

जिल्ह्यात प्रथमच पूर्णपणे खाजगी स्वरूपातील टेक्निकल संस्था ‘यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ कणकवलीत सुरू कणकवली (प्रतिनिधी) : आजच्या बदलत्याकाळात केवळ पदवी असून चालत नाही, तर हाताला कौशल्य असणे ही काळाची गरज बनली आहे. नेमकी हीच गरज ओळखून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच पूर्णपणे खाजगी…

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. यावेळी विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा देतानाच संघटना बांधणीच्या अनुषंगाने ही चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

शिक्षक पात्रता परीक्षा २८ जून रोजी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने रविवार, २८ जून रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जिल्हयातील सहा परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता पेपर क्रमांक एकसाठी १ हजार ९०३ उमेदवार, तर पेपर क्रमांक दोनसाठी २ हजार २०९ उमेदवार असे…

चिरेखाण व्यावसायिकांची २२ रोजी सभा

चौके (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व चिरेखाण व्यावसायिकांची सभा शुक्रवार, २२ मे रोजी सकाळी १० वाजता पत्रकार भवन, सिंधुदुर्ग (जिल्हा बँकेच्या बाजूला) येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी जिल्ह्यातील सर्व चिरेखाण व्यावसायिकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा चिरेखाण…

कणकवलीतील सर्व १७५ मेडिकल बंद

सर्व मेडिकल व्यवसायिक आंदोलनासाठी ओरोसला रवाना कणकवली (प्रतिनिधी) : देशभरातील मेडिकल व्यवसायिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज आंदोलन पुकारले असून यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा तसेच कणकवली तालुक्यातीलही मेडिकल व्यावसायिक सहभागी झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कणकवली शहर व तालुक्यातील सर्व 175 मेडिकल्स मंगळवारी…

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद रायगड-तथा-रत्नागिरी-तथा सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघाकरिता निवडणूक कार्यक्रम १८ मे २०२६ रोजीपासून घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून…