Category सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेकडून रक्तदान शिबिर संपन्न

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : उपजिल्हा रुग्णालय येथील रक्तपेढीत अल्प प्रमाणात उपलब्ध असलेल्या रक्त साठ्यामुळे आणि सामाजिक बांधिलकी जोपासत सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय, ओरोस येथे संघटनेमार्फत रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आव्हान करण्यात आले होते. सदर च्या शिबिरामध्ये…

दर्पण” गृहनिर्माण प्रकल्पाचे उद्या भव्य भूमिपूजन सोहळा

सिधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या पुढाकारातून आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधूदर्पण गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी दर्पण पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन 17 मे रोजी दुपारी…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न

मान्सूनपूर्व सज्जतेचा इशारा ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क राहावे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आगामी मान्सून हंगाम, संभाव्य अतिवृष्टी, चक्रीवादळे तसेच ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापनाची प्रभावी तयारी करावी, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. जिल्हास्तरीय…

धाकधूक ; 10 वीचा निकाल उद्या

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (८ मे) जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी अधिकृत…

जन्मदात्या आईच्या खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेसह आर्थिक दंडाची शिक्षा

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : स्वतःच्या जन्मदातीचा खून केल्याप्रकरणी सावंतवाडी तालुक्यातील विलवडे वरचीवाडी येथील दीपक विष्णू दळवी (वय ४७) यांना जिल्हा न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे. तसेच दहा हजार रुपये आर्थिक दंड ठोठावला आहे. २५ ऑगस्ट…

सिंधुदुर्गनगरीत दर शनिवारी भरणार ‘अस्सल गाठवठी आठवडा बाजार’

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिस यांच्याहस्ते ९ मे रोजी उदघाटन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ग्रामिण भागातील शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी आणि ग्राहकांना ताजा शेतमाल मिळावा या उद्देशाने सिंधुदुर्गनगरी पंचक्रोशी मधील लोकांच्या सोईसाठी दर शनिवारी ‘अस्सल गाठवठी आठवडा बाजार’ भरविण्यात येणार आहे. शनिवार दिनांक…

आंबा व काजू पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात यंदा कडाक्याची थंडी आणि अवेळी पडलेल्या पावसामुळे आंबा व काजू या प्रमुख फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव सादर करावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…

जिल्ह्यातील अग्रगण्य डॉन बॉस्को स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा १२वीचा १०० टक्के निकाल

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नामांकित डॉन बॉस्को स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने यंदाच्या बारावी परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला यशाची जोड मिळाल्याने संस्थेचा निकाल पुन्हा एकदा उज्ज्वल ठरला…

रुग्णसेवेला गती देणारे पाऊल

सिंधुदुर्गात बाह्यरुग्ण विभागातील लघु शस्त्रक्रीया गृहाचे लोकार्पण सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे रुग्णसेवेला अधिक सक्षम व गतिमान बनविणाऱ्या बाह्यरुग्ण विभागातील लघु शस्त्रक्रीया गृहाचे लोकार्पण मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.…

पर्यटनाला नवे पंख; अणाव दाबाची वाडी उद्यानामुळे सिंधुदुर्ग नगरीचा बदलणार चेहरामोहरा !

जिल्हा नियोजन समिती, सिंधुदुर्ग योजनेतून पालकमंत्री नितेश राणे दिला निधी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला गती देण्यासाठी सिंधुदुर्गनगरी लगत अणाव दाबाची वाडी तलाव शेजारील उद्यानामुळे परिसराच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडणार आहे. जिल्हा नियोजन समिती, सिंधुदुर्ग अंतर्गत जिल्हा वार्षिक…