वैभववाडी (प्रतिनिधी) : दिनांक १५ मे २०२६ रोजी पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख कुमारी सिद्धी संतोष वसंत नारकर (मांगवली – वैभववाडी) तसेच मांगवली शाखा प्रमुख सचिन आयरे यांनी असंख्य कार्यकर्ते आणि नागरिकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे मनसे आणि ठाकरे गटाला वैभववाडी तालुक्यात मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावेळी मांगवली गावातील भाजपा कार्यकर्ते राजेंद्र राणे, महेश संसारे, कोळपे पंचायत समिती सदस्या सौ. सुवर्णा संसारे तसेच मांगवली गावचे सरपंच शिवजी नाटेकर उपस्थित होते.
भाजपाच्या वाढत्या जनाधारामुळे आगामी स्थानिक राजकारणात या पक्षप्रवेशाचे महत्त्व वाढले असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.














