कणकवली (प्रतिनिधी) : शासनाने आपत्कालीन स्थितीत एप्रिल ते जूनपर्यंतचे धान्य रास्तदराच्या धान्य दुकानांच्या माध्यमातून एकावेळी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आलेल्या धान्याची वाटप कार्यवाहीही सुरू झाली. मात्र, पुरेशा प्रमाणात धान्य उपलब्य न झाल्याने अंतिम तारखेपर्यंत काही लाभार्थी वंचित राहिले आहेत. मात्र १५ मे नंतर एप्रिलचे धान्य ई पॉस मशिनवर उपलब्ध होत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. सदरचे धान्य ई-पॉस मशिनवर उपलब्ध करून देण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्हा व शहर रास्तभाव दुकानदार व रॉकेल धारक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश पेडणेकर यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी पालकमंत्री नीलेश राणे, जिल्हाधिकारी, तहसिलदार यांनाही दिले आहे.
की, आपत्कालीन परिस्थितीत या निवेदनात म्हटले आहे गरीब लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्यासाठी एप्रिल ते जून २०२६ पर्यंतचे धान्य वितरीत करण्यात येत होते. काही दुकानांमध्ये हे धान्य उशिराने पोहोच झाले आहे.
परिणामी, लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्यास दुकानांमध्ये धान्य नव्हते. अशी अनेक ठिकाणी परिस्थिती असताना एप्रिल महिन्याचे धान्य वितरण करण्यासाठी १५ मे ही अंतिम तारीख होती.
मात्र, धान्य उशिराने पोहोच झाल्याने अनेक लाभार्थी वंचित आहेत. यामुळे लाभार्थी व दुकानदार यांच्यात वाद होत आहेत.
सदरचे धान्य वितरीत करण्यास जून २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी श्री. पेडणेकर यांनी केली आहे वाद टाळून वंचित लाभार्थ्यांना धान्य देण्यासाठी मुदतवाढीची आवश्यकता आहे.













