ग्रामस्थांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार
देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील शिरवली तालुक्याचा शेवटचा गाव आहे. या गावांमध्ये कित्येक वर्ष एसटीची सुविधा शिरगाव ते शिरवली अशी नव्हती याची मागणी शिरवली ग्रामस्थ, शिरगाव व्यापारी तसेच शिरगाव शिक्षण प्रसारक मंडळ शिरगाव हायस्कूल शिरगाव नेहमी वारंवार केली होती. या सर्व ग्रामस्थांचा देवगड तालुक्याचे तसेच शिरगाव मधील सर्व आस्थापनाशी संबंध येतो परंतु ST सुविधा नसल्याने या सर्व ग्रामस्थांना शिरगाव तसेच तालुक्याच्या ठिकाणी जाणे येणे शक्य होत नव्हते. याची कल्पना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदनाद्वारे देताच त्यावर तात्काळ कार्यवाही होऊन आजपासून शिरगाव शिरवली ही बस फेरी नियमित सुरू करण्यात आली. यासाठी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी पाठपुरावा केला.
आज या बस फेरी शुभारंभ प्रसंगी गावातील ग्रामस्थ तसेच भाजपा पदाधिकारी यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य मिलिंद साटम, मंगेश लोके, शिरगाव शाळा समिती सदस्य दिनेश साटम, शिरगाव शाळा मुंबई समिती सदस्य गणपत तावडे, यावेळी सरपंच सुचिता मोहिते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गाडीचे स्वागत करण्यात आले. पोलीस पाटील बिंदुसार नांदगावकर, बबलू कदम, सुनील पोयरेकर, दिनेश पोयरेकर, श्रीधर सोगम, सिद्धार्थ कदम, रवींद्र कदम, प्रमोद कदम, अनिल नवले इत्यादी ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही बस फेरी सुरू झाल्यामुळे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांचे आभार मानले. तसेच ही बस फेरी सुरू करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले या सर्वांचे आभार भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी मानले.













