Breaking News

माजी केंद्रिय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले उद्या गोव्यात

पणजी (प्रतिनिधी) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम. डॉ. रामदास आठवले हे उद्या बुधवार दि.20 मे 2026 रोजी गोवा दौऱ्यावर येत असल्याची माहिती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव-रमाकांत जाधव यांनी दिली.

उद्या सकाळी 10 वाजता मोपा, पेडणे गोवा विमानतळावर ना.डॉ. आठवले यांचे आगमन व स्वागत होणार आहे. त्यानंतर गोव्यात विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत, कार्यकर्त्यांची पणजीत बैठक होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष-अजितकुमार कदम, जिल्हा संघटक- अॅड.एस. के. चेंदवणकर, जिल्हा सरचिटणीस-प्रकाश कांबळे, जिल्हा खजिनदार आनंद पेंडूरकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका ज्योती रमाकांत जाधव, जिल्हा उपाध्यक्षा सौ. जागृती सासोलकर, जिल्हा सरचिटणीस निताली कांबळे, सहसचिव प्रगती कांबळे, जिल्हा खजिनदार-सौ. समिधा निगुडकर यांनी केले आहे.