मुंबई (प्रतिनिधी) : देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमवेत आज मंत्रालय येथे ‘कसं काय?’ या अधिकृत जनजागृती मोहिमेचे तसेच आरोग्यगीताचे लोकार्पण केले.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ या अभियानाचा भाग म्हणून ही ‘कसं काय?’ जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. लोकांचा आरोग्य विषयांमध्ये सक्रिय सहभाग वाढवणे, आरोग्यविषयक जनजागृती अधिक बळकट करणे तसेच आरोग्यसेवांबाबत नागरिकांमध्ये विश्वास आणि मागणी निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमास मंत्रिमंडळातील इतर सदस्य, वरिष्ठ अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे मान्यवर उपस्थित होते.













