महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्तीपत्र देऊन केले अभिनंदन
कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार प्रमोद जठार यांच्यावर राज्य पातळीवर एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी जबाबदारी सोपवली आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” च्या राज्यस्तरीय समितीवर आमदार प्रमोद जठार यांची ‘सन्माननीय सदस्य’ म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे रायगड जिल्ह्याचे प्रभारी म्हणून धुरा देण्यात आली आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकृत पत्राद्वारे प्रमोद जठार यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत, त्यांच्या अनुभवाचा फायदा या अभियानाला गती देण्यासाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.













