Breaking News

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते एस. एस. मुंबरकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा सामाजिक क्षेत्रातील सक्रिय व्यक्तिमत्त्व सखाराम शिवराम उर्फ एस. एस. मुंबरकर (मूळ गाव मिठमुंबरी, ता. देवगड) यांचे आज सायंकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास ठाणे येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
एस. एस. मास्तर या नावाने सर्वपरिचित असलेल्या मुंबरकर यांनी मुंबई महानगरपालिकेत साध्या बॉय पदापासून ते क्लास-वन अधिकारी पदापर्यंतचा प्रवास अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने पूर्ण केला होता. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला होता.
त्यांच्या निधनाने आंबेडकरी विचारांच्या चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील.
एस. एस. मास्तर यांच्या निधनाने समाजातील एक खंबीर आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त होत असून त्यांना सर्व स्तरांतून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.