Breaking News

मडगावपर्यंत रेल्वे सेवा पूर्ववत; जनशताब्दीसह चार गाड्या पुन्हा पूर्ण मार्गावर धावणार

मडगाव (प्रतिनिधी) : प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी असून, पूर्वी काणकोण (Canacona) आणि थिवीम स्थानकांपर्यंत मर्यादित करण्यात आलेल्या काही रेल्वे गाड्यांच्या सेवा ८ जून २०२६ पासून पुन्हा मडगाव जंक्शनपर्यंत पूर्ववत करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने याबाबत माहिती दिली.

पूर्ववत करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये खालील गाड्यांचा

समावेश आहे :

गाडी क्र. ५६६१६ मंगळुरू सेंट्रल- मडगाव जंक्शन एक्स्प्रेस

गाडी क्र. ५६६१५ मडगाव जंक्शन – मंगळुरू सेंट्रल एक्स्प्रेस

गाडी क्र. १२०५१ मुंबई सीएसएमटी- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस

या सर्व गाड्या ८ जून २०२६ पासून पुन्हा मडगाव जंक्शनपर्यंत ये-जा करणार आहेत. यापूर्वी या गाड्यांचे संचालन काणकोण किंवा थिवीम स्थानकांपर्यंत मर्यादित करण्यात आले होते.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन केले असून झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.