मुंबईचा नेवल युनायटेड संघ ठरला अंतिम विजेता
कोल्हापूरचा जॉन संघटना संघ ठरला उपविजेता
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली फुटबॉल क्लब च्या वतीने दि.5 ते 7 जून कालावधीत विद्यामंदिर हायस्कूल कणकवलीच्या भव्य पटांगणावर राज्यस्तरीय कणकवली चॅम्पियन्स ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. गेली चार वर्षे सातत्याने या क्लब कडून फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले जात होते. परंतु यावर्षी प्रथमच ही स्पर्धा भव्य स्वरूपात आणि साखळी सामने अशी आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये नेवल युनायटेड संघ, मुंबई अंतिम विजेता ठरला तर जॉन संघटना संघ,कोल्हापूर उपविजेता ठरला.
या राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी, गोवा आणि सिंधुदुर्गा मधून एकूण 16 नामांकित संघ सहभागी झाले होते.या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख रक्कम 26026 व आकर्षक चषक तसेच द्वितीय पारितोषिक 16026 व आकर्षक चषक तसेच बेस्ट स्ट्रायकर, बेस्ट डिफेंडर, बेस्ट गोल कीपर व प्ले मेकर ऑफ द टूर्नामेंट असे विविध वैयक्तिक पारितोषिके विजेत्यांना आकर्षक चषक व बक्षिसे क्लब च्या वतीने देण्यात आली.या स्पर्धेचे उद्गाटन कणकवली शहराचे प्रथम नागरिक मा. श्री संदेश पारकर,कणकवली शहर पोलीस निरीक्षक मा. नलावडे साहेब,डॉ विद्याधर तायशेटे,कृपाळ सर,विवेक मूंज आदि उपस्थित होते.
स्पर्धेच्या सेमी फायनलची पहिली लढत जॉन संघटना कोल्हापूर विरुद्ध स्पार्टन एफसी पडवे यांच्यात रंगली या सामन्यात जॉन संघटना कोल्हापूर या संघाने स्पार्टन एफसी पडवे या संघावर ४-० अशा एकतर्फी फरकाने फायनल मध्ये प्रवेश केला. तसेच दुसरा सेमी फायनल सामना नेवल विनायटेड मुंबई विरुद्ध वर्षा विश्वास कोल्हापूर या दोन तुल्यबळ संघांमध्ये झाला,हा सामना नेवल यूनाइटेड ने पेनल्टी शूटआउट मध्ये आपल्या नावे करत स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.
अंतिम सामना प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये खेळवण्यात आला.अंतिम सामन्यातील दोन्ही संघ मुंबई आणि कोल्हापूर मधले नामांकित असल्यामुळे हा सामना एकदम चुरशीचा पाहायला मिळाला.हा सामना देखील बरोबरीत समाप्त झाल्याने सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआउट द्वारे करण्यात आला.पेनल्टी शूटआउट मध्ये नेवल यूनाइटेड मुंबई संघाने जॉन संघटना कोल्हापूर या संघावर ३-२ अश्या स्कोर ने मात केली आणि कणकवली चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ पर्व ४ थे वर आपलं नाव कोरले. या सामन्यात नेवल यूनाइटेड संघाचा गोलकीपर “करण विक्रम सिंघ” याने उत्कृष्ट खेळ करत अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मैच किताब पटकावला व आपल्या संघाला विजयी केले.
विजयी संघ-नेवल यूनाइटेड मुंबई
उपविजेता संघ-जॉन संघटना कोल्हापूर
स्पर्धेचा उत्कृष्ट स्ट्राइकर – सर्वेश वाडकर(जॉन संघटना कोल्हापूर)
उत्कृष्ट गोलकीपर-अनिल जानकर(जॉन संघटना कोल्हापूर)
उत्कृष्ट डिफेन्स -प्रांजल(नेवल यूनाइटेड मुंबई)
प्लेमेकर -मानव दुखंडे (नेवल यूनाइटेड मुंबई)
विशेष म्हणजे या स्पर्धेला लाभलेले पंच हे शिवडाव गावाचे भूमिपुत्र “सागर शिवडावकर” जे मुंबई ला फुटबॉल रेफरी ऑफिशल म्हणून कार्यरत आहेत यांचा अनुभव आणि अचूक निर्णय क्षमता आपल्या स्पर्धेला लाभली. या स्पर्धेच्या नियोजना साठी कणकवली फुटबॉल क्लबचे मुख्य सल्लागार संजय कदम, अध्यक्ष सूरजकुमार मणी, ओंकार माडकर,आकांक्ष घाणेकर,गौरव मुंज,प्रज्ञेश निग्रे,किरण परब,अभी गुप्ता,वैभव कदम यांनी विशेष मेहनत घेतली होती.














