Category कोकण

खारेपाटण शिवसेनेच्या वतीने प्रा.आ.केंद्र येथे कै.बाळा वळंजू स्मृती दीन साजरा

श्री निखिल वळंजू यांच्या प्रमुख उपस्थित रुग्णांना फळे वाटप खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघाचे माजी सदस्य व खारेपाटण विभागातील झुंझार नेतृत्व कै.बाळा वळंजू यांचा १६ वा स्मृती दीन खारेपाटण शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र…

राज्य निवडणूक आयोगाची आज सायंकाळी पत्रकार परिषद

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकबाबत आचारसंहितेची करणार घोषणा ? मुंबई (प्रतिनिधी): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाची आज सायंकाळी 4 वाजता सचिवालय जिमखाना येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.या पत्रकार परिषदेला राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे संबोधित…

खड्डेमय झालेल्या कुडाळ मालवण रस्त्यावर शिवसेना आज बैलगाडीद्वारे करणार जनआंदोलन

शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व कुडाळ मालवण वासियांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण राज्यमार्ग सध्या खड्ड्यांनी भरून गेला असून वाहन चालकांसाठी तो मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.…

उद्या कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग नोंदणी शिबिर

दिव्यांग लाभार्थ्यांसाठी संधी जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी लाभ घेण्याचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनांखालील अनुदानात वाढ…

भाजपाच्या निष्ठावान प्रामाणिक कार्यकर्त्यांना मिळणार प्रभाग 17 मध्ये संधी

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री नितेश राणेंकडे करणार शिफारस माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या निवासस्थानी शहर भाजपाच्या बैठकीत एकमुखी मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरामध्ये गेले काही वर्षे नगरपंचायत मध्ये सत्ता असताना येत्या निवडणुकीमध्ये कणकवली शहरात 17 प्रभागांमध्ये भाजपाचे एका प्रभागात एका…

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना — सागरी विकासासाठी राज्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

२६ जानेवारीपर्यंत योजना लागू करण्याच्या दृष्टीने परीपूर्ण आराखडा तयार करा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारी २०२६ रोजी लाग करण्याचे उद्दीष्ट आहे. त्या अनुषंगाने विभागाने समन्वयाने काम करून या योजनेचा आराखडा…

शशिकांत तांबे यांना बेस्ट टिचर पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मुंबई शिक्षक साहित्य मंडळ, मुंबई आयोजित यावर्षीच्या “बेस्ट टिचर पुरस्कार ‘व “राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेतील सन्मान “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७राष्ट्रीय व ३८राज्यस्तरीय पुरस्कारांचे मानकरी साहित्यिक शिक्षक शशिकांत तांबे यांना जाहीर झाला आहे. २२नोव्हेंबर२०२५रोजी रविंद्र नाट्ममंदिर प्रभादेवी, मुंबई येथे…

अंगणवाडी मदतनीस पदासाठी पात्र महिलांनी ११ नोव्हेबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी ( प्रतिनिधी) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प देवगड अंतर्गत अंगणवाडी मदतनीस ही पदे भरण्यात येणार आहे. सदरची पदे ग्रामपंचायत नाडण, कट्टा, नारिंग्रे, किंजवडे, खुडी व मुटाट या महसूल गाव क्षेत्रातील अंगणवाडीमध्ये प्रत्येकी 1 पद भरण्यात येणार आहे.…

वैभववाडी तालुक्यातील आरोग्य यंत्रनेत सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलन करणार

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून प्रशासनाच्या ढीसाळ कारभाराचा व पालकमंत्र्याच्या दुर्लक्षाचा फटका येतील सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. याबाबत आपण राज्याचे आरोग्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असून यात सुधारणा झाली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने…

डोक्यात घातले डस्टबिन | सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सावंतवाडी (प्रतिनिधी) : किरकोळ कारणावरून उद्भवलेल्या वादानंतर दोघांनी मिळून एका युवकावर हल्ला केल्याची घटना सावंतवाडीत घडली आहे. गाडीचा दरवाजा लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर दोघांनी डस्टबिनने युवकाच्या डोक्यावर वार करत मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी…