Category आर्थिक

महागाईचा भडका ! 10 दिवसांत तिसऱ्यांदा वाढलं पेट्रोल डिझेल

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महागाईनं सर्वसामान्य लोकांचं कंबरडं पार मोडून गेलं आहे. १० दिवसांत आता तिसरा धक्का बसला आहे. सलग तिसऱ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. जागतिक बाजारातील घडामोडींमुळे देशात सलग पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असून, आज शनिवारी…

कुडाळमध्ये इंधन टंचाई

पेट्रोल-डिझेलचा साठा संपल्याने वाहनधारकांची प्रचंड ओढाताण कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ शहरात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले. शहरातील बहुतांशी पेट्रोलपंपांवरील पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपल्याने सोमवारी सकाळपासूनच पंपांवर ‘पेट्रोल-डिझेल संपले आहे’ असे फलक…

डामरेत राहते घर जळून खाक; पावणे दोन लाखांचे नुकसान

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील डामरे वरवचिवाडी येथील भिकाजी नारायण सावंत यांच्या घराला 3 मे रोजी मध्यरात्री रात्री 1 वाजता लागलेल्या आगीत 1 लाख 85 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यावेळी घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. 3 मे रोजी मध्यरात्री…

जायबंदी मजूर कामगाराला केली आर्थिक मदत

हनुमंत तळेकर, शशांक तळेकर, अविनाश वाडये यांनी जपला माणुसकीधर्म तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे सरपंच हनुमंत तळेकर व त्यांच्या मित्रांनी हातावर पोट असणाऱ्या मजूरकामगाराला संकटकाळी आर्थिक मदत देऊन माणुसकी धर्म जपून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. निलेश कांजीर हा रोज मोलमजुरी करून…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला इंधन व गॅस पुरवठ्याचा सखोल आढावा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात IOCL, BPCL व HPCL या तेल कंपन्यांच्या गॅस तसेच पेट्रोल/डिझेल विभागाच्या सेल्स अधिकाऱ्यांसह MNGL कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक पार पडली. जिल्ह्यातील इंधन व गॅस पुरवठ्याची स्थिती सुरळीत ठेवण्याच्या…

कांदळगाव येथे शॉर्टसर्किटमुळे भीषण आग

आंबा – काजू बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान मालवण (प्रतिनिधी) : तालुक्यातील कांदळगाव येथे चंद्रशेखर आत्माराम परब यांच्या मालकीच्या सुमारे १६ एकर बागायती क्षेत्रात शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत आंबा व काजू बागायतीसह इतर झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान…

सिलिंडर वितरणातील घोळ संपता संपेना

कणकवली (प्रतिनिधी) : येथील एलपीजी गॅस सिलिंडरचा लपंडाव संपता संपत नाही. नियमानुसार बुकींग २५ दिवसांनी व त्यानंतर तीन दिवसांत सिलिंडर मिळण्याचे जाहीर केले असले, तरीही येथे बुकींग होऊन आठवडा झाला, तरीही सिलिंडर मिळणे कठीण बनले आहे. मात्र, शहरातील एका एजन्सीकडे…

हडपीड येथे १५ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा भक्तिभावात साजरा होणार

देवगड (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, जोगेश्वरी (मुंबई) यांच्या वतीने हडपीड (देवगड) येथील श्री स्वामी समर्थ मठात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा बुधवार, दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. या…

मच्छिमार संस्थांना होणाऱ्या डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; मच्छिमारीवर मोठे संकट

शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मच्छिमार संस्था पदाधिकाऱ्यांची मागणी मालवण (प्रतिनिधी) : आखाती भागात सुरु असलेल्या युद्धामुळे औद्योगिक डिझेलचे दर वाढले असून तेल कंपन्यांकडून मच्छिमार सहकारी संस्थांना देण्यात येणाऱ्या डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. मच्छिमारी व्यवसाय मोठ्या संकटात आला…

नांदगाव पंचक्रोशीत घरगुती गॅसच्या कृत्रिम तुटवड्यामुळे ग्राहकांना मनस्ताप

घरगुती गॅस ग्राहकांना सुरळीत गॅस पुरवठा करा ; कणकवली तहसिलदारांकडे शिष्टमंडळाची मागणी नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशीत काही सब वितरकांमार्फत ग्राहकांना गॅस वितरण केले जाते. मुख्य इंडेन व भारत गॅस एजन्सी कणकवली व फोंडा येथून हा घरगुती गॅस…