Breaking News

हडपीड येथे १५ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा भक्तिभावात साजरा होणार

देवगड (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, जोगेश्वरी (मुंबई) यांच्या वतीने हडपीड (देवगड) येथील श्री स्वामी समर्थ मठात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा बुधवार, दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे.

या पावन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ७ ते १० या वेळेत पादुका पूजन व होमहवन होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० ते १२ या वेळेत नामस्मरण, दुपारी १२ ते १ या वेळेत महाआरती पार पडणार आहे. दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर दुपारी ३ ते ४ या वेळेत श्री स्वामी कृपा तारकमंत्र पठण होईल, तर सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत भक्तीगीतांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

या सोहळ्यास उपस्थित राहून श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर धा. राणे व संस्थापक सचिव श्री. नंदकुमार तु. पेडणेकर यांनी केले आहे.