मालवण (प्रतिनिधी) : ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशन, पुणे शाखा सिंधुदुर्ग विभाग, मालवण यांच्यावतीने जिल्हा अधिवेशनाचे आयोजन १५ मार्च रोजी कणकवली येथे करण्यात आले आहे. हे अधिवेशन सकाळी १०.३० वाजता डॉ. नवरे हॉस्पिटलसमोर, मातोश्री मंगल कार्यालय येथे जिल्हाध्यक्ष एस.ए. डिसोजा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
पोस्ट, टेलिफोन, रेल्वे, बीएसएनएल, सेंट्रल पोलीस फोर्स, सेवाभारत, ऑर्डनन्स फॅक्टरी, ऑडिट, आयकर, आकाशवाणी, दूरचित्रवाणी आदी विविध विभागातील निवृत्त कर्मचारी व पेन्शनर्स या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. अधिवेशनाचे उद्घाटन बीएसएनएलचे माजी डेप्युटी जनरल मॅनेजर एच. एफ. चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून एस. बी. सोनाळकर (ऑर्गनायझिंग सेक्रेटरी), मनोहर पत्की (जनरल सेक्रेटरी पोस्टल) तसेच के. एस. कुलकर्णी (जनरल सेक्रेटरी टेलिकॉम) उपस्थित राहणार आहेत. नरेंद्र बांदिवडेकर व एल. बी. रहाटे हेही प्रमुख उपस्थिती दर्शवणार आहेत. या अधिवेशनात शारीरिक मानसिकदृष्ट्या मुला-मुलींना मिळणाऱ्या सवलती, घटस्फोटीत, विधवा, अविवाहित मुलींना मिळणाऱ्या पेन्शनबाबत नवीन आदेशांची माहिती देण्यात अपंग येणार आहे. भारत सरकारच्या नवीन पेन्शन आदेशांची मांहिती, आठव्या वेतन आयोगाबाबतची माहिती, संघटना बळकटीकरणाबाबत चर्चा होणार आहे. सर्व पेन्शनर्सनी अधिवेशनाला उपस्थित राहवे, असे आवाहन एस. ए. डिसोजा, जी. एम. मसुरकर, पी. एल. मोहिते व एम. डी. जोशी यांनी केले आहे. एस. व्ही. मराठे ७०६६८९३८८८, बी. डी. घाडी, जी. एम. महाडेश्वर, एस. व्ही. पोयेकर, डी. जे. रावराणे यांच्याशी संपर्क साधावा.












