देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली
११ दिवस चालणार गुरुलिलामृत पोथीचे वाचन
देवस्थानचे विश्वस्त महेश गोगी व प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते पारायण सेवेचे शुभारंभ
अक्कलकोट (प्रतिनिधी): अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त समितीचे विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली व मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी यांच्या उपस्तिथीत मोठ्या भक्तीमय वातावरणात गुरुलीलामृत या पोथीच्या सामुदायिक पारायण सेवेस नुकतच देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात प्रारंभ झाला. सदरहू पारायण सेवा दिनांक ०४ एप्रिल ते दिनांक १४ एप्रिल अखेर सकाळी ८ ते ११ या वेळेत संपन्न होणार आहे. पारायण सोहळ्यात २६८ भाविकांनी सहभाग नोंदविले असल्याची माहिती विश्वस्त महेश गोगी यांनी दिली. महिला भाविकांची या सोहळ्यात अग्रक्रमाने उपस्थिती आहे. या प्रसंगी बोलताना प्रथमेश इंगळे व विश्वस्त महेश गोगी यांनी श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवातील पारायण सोहळ्यात श्री गुरुलीलामृत ग्रंथाचे पोथी वाचन म्हणजे पारायणकर्ते भाविकांना स्वामी भक्तीची मिळालेली सुवर्ण संधी आहे. सालाबादानुसार परंपरेप्रमाणे याही वर्षी देवस्थानने या पारायण सोहळ्यात सहभागी होऊन स्वामींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी घ्यावे अशी भावना व्यक्त केली. या प्रसंगी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीपाद सरदेशमुख, गिरीश पवार, अविनाश क्षीरसागर, महेश मस्कले, श्रीशैल गवंडी, संजय पवार, संतोष जमगे, अक्षय सरदेशमुख, सिद्धाराम कुंभार, महेश काटकर, प्रसाद सोनार, बापू घोसले, प्रा. शिवशरण अचलेर इत्यादी उपस्थित होते.












