मसदे स्वामी समर्थ मठ येथे 9 एप्रिल रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन !

मसुरे (प्रतिनिधी) : आयुष्मान आरोग्य मंदिर मसदे, विवेकानंद नेत्र रुग्णालय व पिरामल स्वास्थ यांच्या सहकार्याने 9 एप्रिल रोजी श्री. स्वामी समर्थ मठ, मसदे येथे सकाळी 10 ते 1 या वेळेत मोफत रक्त तपासणी, नेत्र तपासणी व मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी उच्च रक्तदाब, मधुमेह तपासणी, तसेच स्त्रियांसाठी गर्भाशय मुखाच्या कॅन्सर तपासणी, थायरॉईड व कॉलेस्ट्रॉल तपासणी करीता उपाशी पोटी येणे. यावेळी दृष्टिक्षमता व नजर तपासणी, डोळ्यांच्या तिरळेपणाची तपासणी, मोतीबिंदू तपासणी, मशिनद्वारे चष्मा नंबर तपासणी तसेच उच्च रक्तदाब व मधुमेह आजाराच्या उपलब्ध असलेल्या गोळ्या मोफत मिळतील. लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.