विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रमोद जठार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे, चंद्रकांत पाटील अशा दिग्गज नेत्यांची उपस्थिती भरला अर्ज

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री. प्रमोद जठार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण, मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील, महसूल श्री. चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री श्री. जयकुमार गोरे, आमदार प्रसाद लाड आदी मान्यवर उपस्थित होते.