वेंगुर्ला (प्रतिनिधी) : गाव कामगार पोलिस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य शाखा वेंगुर्ला (वेंगुर्ला पोलिस ठाणे अंतर्गत) संघटनेचे मावळते तालुकाअध्यक्ष मधुसूदन गजानन सुतार- मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली उभादांडा ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात वेंगुर्ला तालुका संघटनेची कार्यकारणी निवडण्यात आली. यात रेडी सुकळभाट भागाचे पोलीस पाटील सिताराम सगुण राणे यांची तालुका अध्यक्ष म्हणून गुप्त मतदानाने निवड करण्यात आली.
या सभेला वेंगुर्ला तालुक्यातील ३४ पोलिस पाटील हजर होते. त्यातील २० जणांनी राणे यांना मतदान केले. तर दाभोली पोलीस पाटील जर्नादन पेडणेकर यांना एकूण १४ मते पडली. उपाध्यक्ष म्हणून विजय शिवराम नार्वेकर (उभादांडा पोलिस पाटील) व सचिव चारुता चंद्रे परब (तुळस पलतड), खजिनदार निलेश सुरेश पोळजी (आसोली भाग १) आणि सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीसाठी वेंगुर्ला तालुक्यातून सुशांत मोहन नाईक (वेतोरा वरचीवाडी), संजना संदिप होडावडेकर (आडेली), सल्लागार म्हणून मधुसूदन गजानन सुतार मेस्त्री (आरवली- बांध, सागरतीर्थ) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच वेंगुर्ला तालुक्यात १३ सदस्यांची कमिटी करण्यात आली.












