58 महाराष्ट्र बटालियन फायरिंग स्पर्धेत ब्रिजेश तुळसणकर व नीरज गुरव यांची निवड
वैभववाडी (प्रतिनिधी): 58 महाराष्ट्र बटालियन, सिंधुदुर्ग अंतर्गत कर्नल अजय राज एल यांच्या नेतृत्वाखाली आयोजित फायरिंग कॉम्पिटिशनमध्ये अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल, वैभववाडी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत प्रशालेतील ब्रिजेश तुळसणकर व नीरज गुरव यांची उत्कृष्ट नेमबाजी मध्ये निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळा व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, वैभववाडीचे पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, जि. प. सदस्य श्रावणी रावराणे, नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, संस्थेचे संचालक शरद नारकर, प्रशालेचे मुख्याध्यापक नादकर बी. एस, मा. पं. स. सदस्य अरुण कदम तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत अभिनंदन केले. या यशासाठी विद्यार्थ्यांना प्रशालेचे एनसीसी सेकंड ऑफिसर संदेश तुळसणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली. विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशीच प्रगती करत शाळेचे व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.












