आंब्रड येथील कथाकथन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ (प्रतिनिधी) : श्री हनुमान वाचनालय व ग्रंथसंग्रहालय आंब्रड यांचेवतीने मराठी भाषा गौरव दिन अर्थात मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज जयंती निमित्त २७फेब्रुवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले प्रारंभी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली, दीप प्रज्वलन आंब्रडचे उपसरपंच विठ्ठल तेली, आंब्रड विकास सोसायटीचे उपाध्यक्ष पंढरी देवळी, वाचनालयाचे अध्यक्ष प्रविण भोगटे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यवाह किरण पारकर, कार्यकारणी सदस्य शशिकांत तेली, पांडूरंग दळवी, ओंकार पांगम, कुसबे पू. प्रा. शाळेचे मुख्याध्यापक श्री. हरमलकर, पोखरण प्राथ शाळेच्या सौ गायत्री बागवे, आंब्रड हायस्कूलच्या सौ नयना हरमलकर, बाजारवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शिल्पा मुळीक, श्रीम स्मिता चिंदरकर, श्रीम नेहा गरुड, श्रीम. सोनाली शिंदे, निलेश कदम, सुरेश मुंज यांचे सहीत शिक्षक ग्रामस्थ विद्यार्थी स्पर्धक उपस्थित होते . कथाकथन स्पर्धेचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष प्रविण भोगटे यांचे हस्ते छ. शिवाजी महाराज यांचे मूर्तीला पुष्पहार अर्पण करून संपन्न झाले. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतांमधे विविध मराठी साहित्यिक, कवी कुसुमाग्रज यांचे मराठी लेखनाचा आढावा घेत मराठीची थोरवी, भाषेतील रसपूर्ण गोडवा वर्णीला, मराठीची गळचेपी थांबवून मराठीचा लिखाणातून बोलण्यातून वाचनातून अधिकाधिक वापर करावा कथा, कादंबरी, नाटक, कवीता, ललित लेख, पौराणिक ग्रंथ अशा अनेकोत्तम साहित्य प्रकारातील ग्रंथसंपदेची वाचनालयात उपलब्धता आहे, त्याचा आबालवृद्धांनी वापर करावा व ज्ञान समृद्ध व्हावे, असे आवाहन अध्यक्ष प्रविण भोगटे यांनी केले. यावेळी श्री हरमलकर गुरुजी, सौ हरमलकर, निलेश कदम, यांनी विचार मांडले. आपल्या अमोघ ओघवत्या भाषेत सुरेख सूत्रसंचालन ह. भ. प. किरण पारकर यांनी केले तर पांडूरंग दळवी यांनी आभार मानले.

कथाकथन स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे- पूर्व प्राथमिक गट*-१) आलिया झहीर काझी प्रा. आंब्रड परबवाडी.

२) भक्ती सत्यवान देवळी आंब्रड राऊळवाडी ३) धनश्री संदीप गांवकर पू प्रा शा पोखरण नं १

प्राथमिक गट १) धनश्री दत्ताराम राऊळ २) स्वरणी निलेश कदम

३) गणेश संदीप गांवकर

माध्यमिक गट १) लावण्या महेंद्र कदम श्री भगवती देवी मा वि

आंब्रड २) दिशा दत्ताराम राऊळ

३) सावित्री भालचंद्र गंगावणे.

विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल अस्मी दळवी, विनंति कदम यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाला ग्रामस्थ पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.