Breaking News

जेष्ठ दिग्दर्शक कै. रघुनाथ कदम यांना अक्षरसिंधुची आदरांजली

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग चे सुपुत्र, ज्येष्ठ दिग्दर्शक आणि रंगकर्मी रघुनाथ कदम यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.अक्षरसिंधू परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. अक्षरसिंधूची श्री.संभाजी सावंत लिखित आणि श्री सुहास वरुणकर दिग्दर्शित” सल” ही एकांकिका त्यांनी पाहिली . त्यांना ती खूप आवडली.काही बदल सुचविले आणि त्या एकांकिकेचे सुधारित रंगावृत्ती रघुकाकांनी केले. आणि मग सल एकांकिकेने इतिहास घडवीला. मूळ पिंड गावाकडचा होताच शिवाय
काही कारणास्तव काकांनी मुंबई सोडली . मात्र उपजतच नाटकाचे त्यांना वेड, मग गप्प बसणार कसे? त्यांची आणि अक्षरसिंधु साहित्य कलामंच कणकवली यांची गट्टी झाली, आणि रघु काकानी अक्षरसिंधूची श्री संभाजी सावंत लिखित”पैल”ही पहिली एकांकिका दिग्दर्शित केली. त्याला राज्य भरातील मानाच्या बऱ्याच स्पर्धांमधून यश मिळाले. आणि त्यानंतर विजय चव्हाण लिखित झंपय ,अल्फा टीव्ही साठी तर श्रीराम रानडे लिखित संगीत तेलाचे गाणे पुण्याच्या संगीत एकांकिका स्पर्धेसाठी अशा एकामागून एक बऱ्याच एकांकिका व नाटक रघु काकांनी अक्षरसिंधूसाठी दिग्दर्शित केली आणि यश खेचून आणले.

संहितेकडे बघण्याचा त्यांचा एक वेगळाच दृष्टिकोन असायचा. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी समांतर रंगभूमीचे विषयही अक्षरसिंधुने हाताळले आणि खणखणीत वाजवले सुद्धा!
अशा रंगभूमीवरच्या अवलियाच्या जाण्याने सिंधुदुर्गातील नाट्य चळवळीची मोठी हानी झालीय. पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली अक्षरसिंधूचे अनेक कलाकार सिनेमा, मालिका, व्यावसायिक नाटकात आज झळकत आहेत.त्यांच्या आत्म्यास सद्गती सह चिरशांती लाभावी अशी प्रार्थना करतानाच रघुकाकांसारखा दिग्दर्शिय दृष्टिकोन आत्मसात करून त्यांचे नाट्यप्रेम सतत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करू अशी त्यांना अक्षरसिंधु साहित्य कलामंच कणकवली परिवाराच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच चैत्राली प्रॉडक्शन्स निर्माती सौ. स्वाती राजेंद्र कदम, श्री राजेंद्र कदम, अष्टपैलू मालवण, कलांकुर ग्रुप मालवण आणि रंगकर्मी, तसेंच कणकवली महाविद्यालय कडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

त्याचबरोबर अक्षरसिंधु साहित्य कलामंच कणकवली चे सदस्य श्री ऋषिकेश उर्फ दादा कोरडे यांच्या आजी, श्री विवेक वाळके यांच्या मातोश्रीं आणि संस्थेचे कलाकार कै अमोल मोर्वेकर यांच्या निधनाबद्दल त्यांनाही भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी अक्षरसिंधु साहित्य कलामंच कणकवली चे संस्थापक श्री विजय चव्हाण, अध्यक्ष श्री संजय राणे, कार्याध्यक्ष श्री हरीभाऊ भिसे, सन्मा.सदस्य श्री विवेक वाळके, आनंद जाधव, सुभाष कदम, सौ. पूजा राणे , रिया राणे संस्थेचे मार्गदर्शक श्री महानंद चव्हाण, सचिव संतोष कदम, खजिनदार मयुर चव्हाण, अजय पडवळ, शशांक परब, साबाजी पराडकर, गावकर, सरंगले आणि नाटयप्रेमी उपस्थित होते.