Breaking News

सातरल येथे श्री लिंगेश्वर पावणादेवी मंदिर जीर्णोद्धार सोहळ्याला पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी भेट

श्री लिंगेश्वर पावणादेवी चे घेतले दर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील सातरल येथील श्री लिंगेश्वर पावणादेवी मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी भेट देऊन पावणादेवीचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला. यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी कणकवली पंचायत समिती उपसभापती राजेश सावंत, आशिये सरपंच महेश गुरव, माजी सरपंच प्रदीप राणे, सुशील राणे, राजेश मेस्त्री, पोलिस पाटील नंदकुमार राणे, अॅड. प्रसाद सावंत, राहुल राणे, सदाशिव राणे आदी मान्यवर उपस्थित होते.