कणकवली शहरात महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची उभारणी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील नागवे रोड रवळनाथ मंदिर शेजारी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे या उपक्रमासाठी ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असल्याचे समजत आहे. पुतळ्याच्या पाठीमागे वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक असा बॅनर देखील लावण्यात आला आहे. या उपक्रमामुळे परिसरात ऐतिहासिक वारशाची जपणूक होणार असून, तरुण पिढीला प्रेरणा मिळण्यास मदत होणार आहे. ग्रामस्थांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. महाराणा प्रताप हे शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणारा हा पुतळा कणकवली शहराच्या वैभवात भर घालणारा ठरणार आहे.