जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन
सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यात फार मोठे नुकसान झाले असून जिल्हाधिकारी व प्रशासनाशी बोलून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळवून देता येईल ते बघू. शासनाच्या निकषा नुसार तसेच चौकटी बाहेर जाऊन देखील लोकांना आधार देऊ, आज आमच्या जनतेला आधाराची गरज आहे असे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथील वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची पाहणी केली त्या वेळी पालकमंत्री बोलत होते.
श्री पंचम खेमराज महाविद्यालय व रामेश्वर प्लाझा येथे वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची पाहणी मंत्री नितेश राणे यांनी केली. नुकसानीचे जास्तीत जास्त भरपाई मिळण्यासाठी अहवाल देण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांना दिले.
यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले की आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि त्यांची टीम जनतेला नुकसान देण्यासाठी प्रयत्नशील आहे.













