कणकवली तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

उद्योजक पुरस्कार संदीप चौकेकर यांना तर ज्येष्ठ पत्रकार संजय माळवदे , उत्कृष्ट पत्रकार चंद्रशेखर देसाई , ग्रामीण पत्रकार संतोष पाटणकर यांना पुरस्कार

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पत्रकार संघाचे सन 2025 – 26 चे पुरस्कार शनिवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार संजय माळवदे, ज्येष्ठ पत्रकार कै. शशी तायशेट्ये उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार चंद्रशेखर देसाई (दै. तरुण भारत ), कै. अनिल सावंत स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार संतोष पाटणकर (दै. लोकमत – खारेपाटन) तर उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार प्रथमेश जाधव यांना जाहीर करण्यात आले आहेत. तर यशस्वी उद्योजक पुरस्कारासाठी शिरवल गावचे सुपूत्र , यशस्वी उद्योजक संदीप चौकेकर ( अध्यक्ष- प्राणजीवन सहयोग संस्था ) , सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी उत्तम पुजारे यांची आणि वृत्तपत्र कर्मचारी सन्मान पुरस्कारासाठी भास्कर रासम ( दै. सकाळ ) यांची निवड करण्यात आली आहे.

कणकवली तालुका पत्रकार संघाची बैठक शनिवारी येथील शासकीय विश्रामगृह , कणकवली येथे पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत एकमताने हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. या बैठकीला जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ , जिल्हा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे , ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर , माजी अध्यक्ष अजित सावंत, तालुका संघाचे सचिव संजय सावंत, खजिनदार रोशन तांबे , उपाध्यक्ष उमेश बुचडे ,सहसचिव दर्शन सावंत, तुषार हजारे , योगेश गोडवे, पत्रकार सुधीर राणे, राजन चव्हाण , रंजिता तहसिलदार , उल्का तावडे, अस्मिता गिडाळे, आदींसह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारितेत उत्कृष्ठ कामगिरी बजावणा-या व उद्योग क्षेत्रात यशस्वी भरारी , सामाजिक क्षेत्रात निस्वार्थी काम करणा-या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान पुरस्कार देवून दरवर्षी केला जातो. त्यानुसार सन 2025 -26 मधील या विविध क्षेत्रांमध्ये समाजभिमुख योगदान देणा-या कर्तुत्वान व्यक्तींची निवड पत्रकार संघाच्या बैठकीत करण्यात आली आहे य सा सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींना सन्मानचिन्ह , शाल ,श्रीफळ , रोख रक्कम देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

तसेच कणकवली तालुका पत्रकार पुरस्कार सोहळा प्रसंगी वृत्तपत्र विक्रेते मालोजी कोकरे ( कणकवली ) , अरविंद मुद्राळे ( तळेरे ) , बाळा फोंडके ( फोंडाघाट ) यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच खारेपाटण येथील कै. सौ. विना राजेंद्र ब्रह्मदंडे यांच्या मरणोत्तर अवयव दानाने जवळपास सहा अवयव उपयोगात येऊन दुसऱ्यांना नवीन आयुष्य देण्याच्या या दानशूर कार्याबद्दल त्यांचे पती राजेंद्र ब्रह्मदंडे यांचा विशेष सन्मान पत्रकार संघाच्यावतीने करण्यात येणार आहे.