२५ वर्षांनंतर सावडावं गावात डाळपस्वारी उत्सवाचा जल्लोष; मुंबईहून चाकरमान्यांची मोठी उपस्थिती

कणकवली (प्रतिनिधी) : सावडावं गावातील अतिप्राचीन श्री देव रामेश्वर पावनाई पंचायतन देवस्थान येथे तब्बल २५ वर्षांनंतर डाळपस्वारी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
दिनांक ११ व १२ एप्रिल या दोन दिवस चाललेल्या या उत्सवात गावकऱ्यांसह मुंबई वरून आलेले चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवस्थान परिसरात धार्मिक विधी, पूजा-अर्चा आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या या उत्सवामुळे ग्रामस्थांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. गावात सर्वत्र आनंदाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
या उत्सवाच्या निमित्ताने सावडावं गावातील एकोपा आणि परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.