तळकोकणात मोठ्या कुस्ती स्पर्धा भरवणार – पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडी (प्रतिनिधी) : मातीतली कुस्ती आज पहिल्यांदाच वैभववाडीत होत आहे. त्याचा निश्चित सर्वांना आनंद आहे. माझ्या मतदारसंघात पश्चिम महाराष्ट्रातून दाखल झालेल्या सर्व पैलवानांचे स्वागत करतो. आज होत असलेली सिंधूनायक कुस्ती स्पर्धा ही सुरुवात आहे. तळकोकणात यापुढे देखील अजून मोठी कुस्ती स्पर्धा भरवून विविध राज्यातील पैलवानांना आमंत्रण करणार आहोत असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. आमच मैदान थोड वेगळ आहे. त्या मैदानात आम्ही कधीच हारत नाही. कारण आम्ही सन्माननीय नारायण राणे साहेबांचे चेले आहोत असेही नितेश राणे यांनी ठणकावून सांगितले.
वैभववाडी येथे माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सिंधूनायक केसरी निकाली कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कुस्ती स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. उपमहाराष्ट्र केसरी विजेता पैलवान प्रकाश बनकर तसेच ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान अमित कुमार दिल्ली हे दोन पैलवान या स्पर्धेचे आकर्षण ठरले. दोन्ही पैलवानांना नितेश राणे यांच्या हस्ते गदा भेट देण्यात आली. या कुस्ती स्पर्धेसाठी जवळपास 70 पैलवान वैभववाडीत दाखल झाले आहेत. ही स्पर्धा रात्री उशिरापर्यंत चालणार आहे.
केक कापून राणे साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, सभापती सिध्देश रावराणे, जि. प. सदस्य प्रमोद रावराणे, कुस्ती समितीचे अध्यक्ष भालचंद्र साठे, कणकवली सभापती सौ. वाळके, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय सावंत, जयेंद्र रावराणे, नासीर काझी, दिगंबर पाटील, उपसभापती साची कोलते, प्राची तावडे, रोहिणी रावराणे, रिद्धी सुतार, देवानंद पालांडे, मंगेश लोके, सुवर्णा संसारे, हुसेन लांजेकर, स्नेहलता चोरगे, शारदा कांबळे, सज्जनकाका रावराणे, राजेंद्र राणे, अतुल सरवटे, विजय तावडे, नेहा माईंनकर, सुनील नारकर, रोहन रावराणे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












