जामसंडे श्रीराम मोरेश्वर गोगटे कॉलेजचा बारावीचा निकाल ७६ टक्के

देवगड (प्रतिनिधी) : जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे उच्च माध्यमिक (एम.सी.व्ही.सी.) ज्युनियर कॉलेज चा बारावीचा एकूण निकाल ७६ टक्के लागला असून या एकूण निकालापैकी इलेक्ट्रिकल विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे.

त्यामध्ये यश सुरेंद्र परब यास ६७.० टक्के गुण मिळून प्रथम तर कु. शुभम हेमंत भाबल ६३.८३ गुण मिळवून द्वितीय तसेच लवेश दत्ताराम घाडी ५६.८३ गुण मिळवत तृतीय आला आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स विभागाचा निकाल ६०.० लागला असून आर्यन जितेंद्र सावंत ७४.५० गुण मिळवत प्रथम क्रमांक तर दर्पण दत्तात्रय पाटील ६३.८३ गुण मिळवत द्वितीय तर करण सुनील मेस्त्री ५८.६७ गुण मिळवत तृतीय आला आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विभाग शिक्षक संदीप शिंगे, संजीवनी धोंगडे, जयप्रकाश पाटील, सुनील भाकरे, राधिका वालकर, नारायण माने यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष अॅड. अजितराव गोगटे, सचिव – प्रवीण जोग, शाळा समितीचे अध्यक्ष प्रसाद मोंडकर, प्राचार्य सुनील जाधव यांनी अभिनंदन केले आहे.