कणकवलीत अवकाळी पावसाचा तडाखा

अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची त्रेधातिरपीट

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीत गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस बरसू लागला. गुरुवारी सकाळपासूनच वातावरणामध्ये उष्णता होती. दुपारच्या सुमारास रणरणते ऊन होते. सायंकाळी चार वाजल्यानंतर वातावरण ढगाळ पडले. वातावरणात अंधार जाणवू लागला त्यानंतर अवघ्या काही वेळातच अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर सद्यस्थितीत इतका आहे की रस्त्यांवरून पाणीदेखील वाहू लागले आहे. परिणामी कणकवली शहरात व्यापारी वर्गासह सर्वांचीच श्रेता तिरपीट उडाली आहे.