कसाल येथील रोमन कॅथोलिक बांधवांकडून असिसी संस्थेतील मुलींना दैनंदिन उपयोगी वस्तूंचे वाटप

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कसाल पाग इन्सुली परिसरातील असिसी संस्थेमध्ये राहणाऱ्या मतिमंद मुलींसाठी कसाल येथील रोमन कॅथोलिक समाजाच्या वतीने दैनंदिन उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे संस्थेतील मुलींना मोठा दिलासा मिळाला आहे. असिसी संस्थेमध्ये फक्त मतिमंद मुली राहतात. या मुलींना अनेक गोष्टी समजत नसल्यामुळे यांच्या संगोपनाची व देखभालीची जबाबदारी सिस्टर मंडळी प्रेमाने आणि समर्थपणाने पार पाडत आहेत. यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी अशा प्रकारच्या मदतीचा मोठा उपयोग होतो. यावेळी रोमन कॅथोलिक बांधवांनी पुढाकार घेत अन्नधान्य तसेच इतर आवश्यक वस्तू संस्थेला सुपूर्त केल्या. याप्रसंगी संस्थेतील सिस्टर व स्थानिक नागरिक उपस्थित होते. मदत दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले. समाजातील गरजू घटकांसाठी अशा प्रकारचे उपक्रम प्रेरणादायी असून दनशूर व्यक्तीनी पुढे येऊन मदतीचा हात द्यावा असे आवाहन करण्यात आले.