देवगड (प्रतिनिधी) : आयनल गावचे रहिवासी तसेच म्हळुंगे रानेवाडी (देवगड) येथील शाळेत कार्यरत असलेले शिक्षणसेवक प्रशांत गंगाराम तांबे (वय ३८) यांचे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत दुःखद व आकस्मिक निधन झाले.
प्रशांत तांबे हे दिलखुलास, प्रेमळ आणि कार्यतत्पर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली जाण्याने शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबाचा आधारस्तंभ हरपला असून, घरातील एकुलता एक कर्ता पुरुष गमावल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील व पत्नी असा परिवार असून, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे समजते. नांदगाव विभागाच्या वतीने दिवंगत प्रशांत तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.












