कणकवलीत ‘यंगस्टार चषक २०२६’ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे यंगस्टार मित्रमंडळ, कणकवली यांच्या वतीने ‘यंगस्टार चषक २०२६’ या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक १७, १८ व १९ एप्रिल २०२६ रोजी कणकवली येथील नगरपंचायत बॅडमिंटन कोर्ट, भालचंद्र महाराज आश्रम शेजारी येथे रंगणार आहे.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात येत असलेल्या या स्पर्धेत राज्यातील नामांकित कबड्डी संघांचा सहभाग अपेक्षित असून कणकवलीत तीन दिवस कबड्डीचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक म्हणून रु. ५५,०००/- व यंगस्टार चषक देण्यात येणार असून द्वितीय पारितोषिक म्हणून रु. ३०,०००/- व यंगस्टार चषक प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी रोख पारितोषिक, तसेच उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई यांसारख्या विशेष पुरस्कारांसह इतर आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत.

यंगस्टार मित्रमंडळाने क्रीडासंस्कृतीला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील कबड्डी खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली असून राज्यभरातील कबड्डी संघांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा तसेच क्रीडारसिकांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी- 9422381900 व 9975853555