डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये कळसुली हायस्कूलच्या कु. अश्मित मुळीक याला सिल्वर मेडल

कणकवली (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक वृद्धिंगित करणे या उद्देशाने इयत्ता सहावी आणि नववी साठी शालेय स्तरावर घेतली जाणारी डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा ही महाराष्ट्रातील विज्ञानातील सर्वोत्तम परीक्षा मानली जाते. या परीक्षेसाठी देशभरातून जवळपास एक लाख तीन हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामधून काही विद्यार्थ्यांची निवड प्रात्यक्षिक परीक्षेसाठी करण्यात आली व या प्रात्यक्षिक परीक्षा यशस्वी रित्या पूर्ण करणारे विद्यार्थी अंतिम कृती संशोधन या टप्प्यासाठी निवड करण्यात आली. कोल्हापूर विभागामधून अंतिम कृती संशोधन साठी निवड झालेल्या कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली प्रशालेतील इ. ९ वी तील कु. अश्मित शैलेश मुळीक याने या मानाच्या परीक्षेमध्ये सिल्वर मेडल प्राप्त केले.
शंभर मार्कांची लेखी परीक्षा व 30 मार्कांची प्रात्यक्षिक परीक्षा हे दोन टप्पे पार करून कु. अश्मित शैलेश मुळीक याने अक्षय ऊर्जा स्त्रोतांचे मूल्यांकन या मुख्य विषय अंतर्गत सौर पॅनलच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणाऱ्या बाह्य घटकांचा अभ्यास करणे व उपाय सुचवणे या कृती संशोधन प्रकल्पाचे उत्तम सादरीकरण केले होते. आदरणीय श्री.अशोक नगरकर यांच्या शुभहस्ते सदर सन्मान प्रदान करण्यात आला.
या स्पर्धेसाठी प्रशालेतील विज्ञान शिक्षक श्री. सी. जी. चव्हाण, मुख्याध्यापक श्री. व्ही. व्ही. वगरे, प्रशालेतील शिक्षक याचप्रमाणे पेशाने शिक्षक असलेले त्याचे आईवडील – श्री. शैलेश मुळीक व सौ. शिल्पा मुळीक यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल त्याचे कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे अध्यक्ष मा. श्री सूर्यकांत दळवी, कार्याध्यक्ष- श्री. विजय सावंत, सचिव – श्री. जय दळवी व इतर संस्था पदाधिकारी, स्कूल कमिटी चेअरमन- श्री. के.आर.दळवी आणि समस्त पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री.व्ही. व्ही.वगरे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद, ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले