खारेपाटण (संतोष पाटणकर): रत्नागिरी जिल्ह्यातील कोंडये, ता.राजापूर या ग्रामीण भागातील लेखक कवी व साहित्यिक “कुडापाण”कार श्री प्रकाश सकपाळ यांना नुकताच कराड येथील हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेचा
“राज्यस्तरीय सुवर्ण नगरी साहित्य गौरव पुरस्कार – २०२६ जाहीर झाला असून त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
साहित्यिक प्रकाश सकपाळ यांचा “कुडपाण” हा बहुजन नायकाची ग्रामीण वास्तव दाखवणारा कथासंग्रह नुकताच सर्वत्र प्रसिद्ध झाला असून अनेक साहित्यिक,समीक्षक,लेखक, विचारवंत यांनी त्यावर छान प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या “कुडपाण” या कथा संग्रहाची दाखल घेत राज्यस्तरीय सुवर्ण नगरी साहित्य गौरव पुरस्कार – २०२६ जाहीर झाला आहे.हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड या संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुनील फडतरे यांनी या पुरस्काराची घोषणा केली असून साहित्यिक श्री प्रकाश सकपाळ यांचे त्यांनी लेखी पत्राद्वारे अभिनंदन केले आहे.
तर या पुरस्काराचे वितरण शनिवार दि.१८ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता कराड येथील हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थित करण्यात येणार आहे.













