सावंतवाडी शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

भाजप युवा नेते विशाल परब, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची उपस्थिती

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. समाज मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात शेकडो भीमसैनिकांनी उपस्थिती लावत परिसर घोषणांनी दणाणून सोडला.

या कार्यक्रमाला भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते मा. विशालजी परब, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोदजी कामत, तसेच सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अॅड. अनिलजी निरवडेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि जयंतीउत्सवाचा शुभारंभकेला.

कार्यक्रमादरम्यान “जय भीम” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला. उपस्थित भीमसैनिकांचा उत्साह आणि एकजूट ही या कार्यक्रमाची खास वैशिष्ट्ये ठरली. सामाजिक समतेचा आणि संविधानाच्या मूल्यांचा संदेश देत जयंतीउत्सवाला प्रेरणादायी सुरुवात झाली.