कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती शाखा कणकवली आयोजित विद्यार्थी गुणगौरव, दत्तक विद्यार्थी व शिक्षक सन्मान सोहळ्याला उदंड प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जि. प. अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, कणकवली सभापती हर्षदा वाळके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी प्रेरणा मांजरेकर, कैलास राऊत, शिक्षक भारती जिल्हा अध्यक्ष संतोष पाताडे, राज्य उपाध्यक्ष दया नाईक, गिल्बर्ट फर्नांडीस आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा कणकवलीच्या महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती शाखा कणकवलीच्या वतीने कणकवली तालुक्यातील 22 विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना दप्तरासहीत वर्षभर पुरणारे शैक्षणिक साहीत्य भेट देण्यात आले. तसेच संघटनेच्या वतीने आयोजित 4 / 5 वी शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील गुणवंत 20 विद्यार्थी, नवोदय परीक्षेत निवड झालेले विद्यार्थी, STS- परीक्षेत विमानाने ईस्त्रो सफरीसाठी निवड झालेले विद्यार्थी, जिल्हा स्तरीय क्रिडा महोत्सवातील यशस्वी विद्यार्थी यांना आकर्षक भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या औचित्याने सेवा निवृत्त शिक्षिका इंदू डगरे, किसन दुखंडे, दुखंडे, तसेच शैक्षणिक वर्षात विविध संस्थांकडून आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक शशिकांत तांबे, राजेश कदम, राजाराम भिसे, कल्पना मलये यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व ग्रंथभेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
मान्यवरांनी शुभेच्छा देताना संघटनेच्यावतीने ज्ञानदाना सोबतच सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबवित असल्याबाबत संघटनेचे कौतुक केले तसेच सर्वोत्तोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्यावतीने शिक्षकांच्या प्रश्नांबाबत मा. संदेश सावंत व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांना निवेदन देण्यात आले. मान्यवरांनी शासन दरबारी रखडलेल्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शिक्षक भारती संघटनेसोबत ठाम उभे राहून 15 दिवसात जिल्हा स्तरावरील सर्व प्रश्न तडीस लावण्याचा शब्द दिला. शिक्षक भारती च्या कार्याने प्रेरित होऊन संतोष पाताडे, गिल्बर्ट फर्नांडिस, विनायक जाधव, महेंद्र पवार यांच्या नेतृत्वात अनेक शिक्षकांनी शिक्षक भारती या संघटनेत प्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका अध्यक्ष महेंद्र पवार यांनी केले. शिक्षकांच्या प्रश्नांबाबत गिल्बर्ट फर्नांडीस यांनी मान्यवरांना अवगत केले. कार्यक्रमाचे निवेदन राजेश कदम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संपर्क प्रमुख प्रशांत बोभाटे, शिक्षक नेते विनायक जाधव, सचिव संजय कोळी, दिलिप शेळके, दिलिप धामापूरकर, अजित कदम, आनंद तांबे, संदीप तांबे, सुनिल कदम, प्रमोद पवार, समीर पाटील, महेश चव्हाण, प्रकाश बुचडे, किरण कोरगावकर, सुहास बंड, मनोज पिळणकर, विलीस चोडणकर, उदय जाधव, नरेंद्र चिंदरकर, सचिन पाटकर आणि संघटना सदस्यांनी मेहनत घेतली.












