ओरोस (प्रतिनिधी) : ओरोस जैतापकर कॉलनी येथील जीवन प्रकाश कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या राखी वसंत पारधी या २६ वर्षीय युवतीने राहत्या घरातील फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. मानसिक आजाराला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी चौकशीत समोर आले आहे. ओरोस पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांच्यासह हवालदार अॅडवर्ड बुतेलो, हवालदार रुपेश नाईक, कॉन्स्टेबल नीलम पांचाळ यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तपास हेड कॉन्स्टेबल शैलेश सोन्सुरकर करीत आहेत. पश्चात वडील, आई, भाऊ असा परिवार आहे.












