मालवणात ज्येष्ठ नागरिक बेपत्ता

शोधणाऱ्यास १० हजारांचं बक्षीस जाहीर

मालवण (प्रतिनिधी) : शहरातील श्री. सुधाकर गणपत नरे (वय ७३) हे घरातून बाहेर पडल्यापासून बेपत्ता झाले आहेत. ते राहणार मालवण, जि. सिंधुदुर्ग असून त्यांच्या शोधासाठी कुटुंबीयांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. दरम्यान, त्यांचा शोध लावणाऱ्या किंवा ठोस माहिती देणाऱ्या व्यक्तीस १०,००० रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा कुटुंबीयांनी केली आहे. त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ खालील संपर्क क्रमांकावर कळवावे, असे आवाहन मुलगा उमेश नरे यांनी केले आहे.
9404758292/7249145780 या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.