अपघाती मयताच्या मोबाईल नंबरचा तपासी अधिकाऱ्याकडूनच गैरवापर ?

रक्षकच बनला भक्षक; मृताच्या नातेवाईकाकडून न्यायाची अपेक्षा

जिल्ह्याच्या बॉर्डरवरील पोलीस ठाण्यातील प्रकाराने खळबळ

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे मोबाईल सिमकार्ड वापरून त्या नंबरवरून आक्षेपार्ह मेसेज करणे तसेच गैरवापर केल्याची तक्रार त्या मृताच्या नातेवाईकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केल्याचे समजत आहे. याबाबत मृताच्या नातेवाईकांनी अधिकृत लेखी तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केल्याचे समजत असून सदर सिमकार्ड आणि हँडसेट अपघात गुन्ह्याच्या तपासी अधिकाऱ्याकडेच असून त्या सिमकार्ड चा गैरवापर संबंधित तपासी अधिकारी गैरवापर करत असल्याची तक्रार मृताच्या नातेवाईकांनी केल्याचे समजते. सिंधुदुर्ग जिल्हा बॉर्डरवरील पोलीस ठाण्यात हा प्रकार घडल्याची तक्रार आहे. मृताच्या सिमकार्ड नंबर वरून आक्षेपार्ह मेसेज करणे, त्या नंबर वर बिझनेस व्हाटसप अकाउंट खोलून डीपी ला अश्लील फोटो ठेवणे असे प्रकार घडत असल्याचे तक्रारीत नमूद असल्याचेही समजत आहे. घर का भेदी लंका डहाये या म्हणीनुसार अपघाती मृताच्या मोबाईल नंबरवरून आणखी कुरापती करण्याआधीच अपघाती मृत व्यक्तीचा मोबाईल नंबर वापरणाऱ्यावर कारवाई होणार काय ? हा सवाल आता उपस्थित होत आहे.