आनंदवाडी श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराचा उद्या वर्धापन दिन

देवगड (प्रतिनिधी) : देवगड आनंदवाडी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराचा २९ वा वर्धापन दिन सोहळा व श्री विठ्ठल रखुमाई मूर्ती पुर्नः प्रतिष्ठापना सोहळा २३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यादिवशी सकाळी ५ वा. श्रींच्या मूर्तीचे मंगलस्नान, ९ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२ वा. महाआरती, १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. महापुरुष महिला भजन मंडळ, खालचीवाडी तारकर्ली यांचे सुश्राव्य भजन, सायंकाळी ७ वा. सांज आरती, रात्री ८ वा. कोयंडे बंधू प्रासादिक भजन मंडळ, कालवीचे बुवा गुणाजी कोयंडे यांचे सुश्राव्य भजन, रात्री १० वा. श्री सोमेश्वर कलामंच प्रस्तुत व गराजलो रे गराजलो आयोजित ‘कलाझंकार’ ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री हनुमान प्रासादिक मंडळ, उत्तरवाडा-आनंदवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.