देवगड (प्रतिनिधी) : वरेरी बौध्दवाडी येथील सौ. सपना संदीप जाधव (३६) ही विवाहीता बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे पती संदीप प्रकाश जाधव यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सौ. सपना जाधव ही विवाहिता १८ एप्रिल रोजी दुपारी २.४५ वा. सुमारास घरातून जेवण आटोपून कोणालाही न सांगता निघून गेली. तिचे मानसिक संतूलन बिघडलेले असून वारंवार घरातून निघून जाण्याची तिला सवय आहे. तिच्या कुटूंबियांनी आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला मात्र तिचा शोध लागला नाही. तिचे पती संदीप प्रकाश जाधव यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार देवगड पोलिस स्थानकात दिली असून तपास महिला पोलिस हवालदार सविता लाड करीत आहेत.












