कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कलमठ ग्रामपंचायतीतर्फे 22 व 23 एप्रिल रोजी ‘किड्स समर कॅम्प 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. माती नेचर रिसॉर्ट, जानवली येथे हा निवासी कॅम्प होणार आहे. या कॅम्पचे उद्घाटन जि.प. सिंधुदुर्ग महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य सौ. सुप्रिया संदीप मेस्त्री, पं. स. सदस्य गुरुनाथ वर्देकर यांच्या हस्ते होणार आहे. कॅम्पमध्ये मुलांसाठी योगासन मार्गदर्शन, नृत्य प्रशिक्षण, पेपर क्राफ्ट, रंगोत्सव, फनी गेम्स, कळसूत्री बाहुल्यांचे सादरीकरण व अवकाश दर्शन असे विविध उपक्रम ठेवण्यात आले आहेत. योगा प्रशिक्षक प्रमोद लिमये, एस.के. डान्स अकॅडमी, चेतन गांगावणे यांचे बाहुल्यांचे सादरीकरण आणि पुण्याचे वेद पेडेकर यांचे अवकाश दर्शन ही या कॅम्पची खास वैशिष्ट्ये आहेत. तर रुपाली कदम, अर्चना गावडे यांचे क्राफ्ट आणि व्यक्तिमत्त्व विकास यावर मार्गदर्शन होणार आहे.
सरपंच संदीप मेस्री, उपसरपंच दिनेश गोठणकर व ग्रामपंचायत अधिकारी प्रविण कुडतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. कलमठ गावातील चौथी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी अनूप वारंग (98223 61036), नितीन पवार (94049 21777) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.












