तोंडवली येथे क्रशर बंदसाठी उद्यापासून उपोषण

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील तोंडवली येथे देवगड- निपाणी राज्यमार्गाच्या सिमेंट काँक्रिट रस्ता कामासाठीच्या क्रशरमुळे परिसरातील घरांना तडे जात असून धुळीचे साम्राज्य पसरले आहे. सदरचा क्रशर बंद करण्यासाठीची मागणी करूनही कार्यवाही न झाल्याने १५ एप्रिल रोजी तोंडवली येथील क्रशरच्या समोरच बेमुदत उपोषणाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. या क्रशरमुळे ५१ घरे बाधित असून त्याचबरोबर परीसरातील पाण्याची पातळी खालवली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.