कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पंचायत समितीच्या तब्बल चार वर्षांनी सभापती हर्षदा वाळके यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती सोनू सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या आज पहिल्या सभेत सदस्य चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या अभिनंदनचा ठराव मांडला.
यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल तसेच आठ ही तालुक्यातील सर्व सभापती, उपसभापती तसेच समाज कल्याण सभापती पदी निवड झालेल्या कणकवलीच्या जिल्हा परिषद सदस्य रुहिता तांबे व जिल्हा नियोजन समितीचा खर्च शंभर टक्के केल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचा अभिनंदन ठराव घेण्यात आला. तसंच सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडून आल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनचा ठराव बबलू सावंत यांनी मांडला.












